मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावनिक पोस्ट; आठवणींना उजाळा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
मुंबई | प्रतिनिधी

कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पोस्टमधील शायरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

«”यूँ बिछड़ा कि रुत ही बदल गई,
एक शख़्स सारे शहर को वीरान कर गया.”»

या ओळी शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कै. अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याचा, लोकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचा उल्लेख करत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी कै. अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन केले. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्ट आणि संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांत कै. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत अनेक ठिकाणी स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना या केवळ श्रद्धांजलीपुरत्या मर्यादित नसून, कै. अजितदादा पवार यांनी समाजात निर्माण केलेल्या प्रभावाची आणि त्यांच्या कार्याच्या कायम स्मरणात राहणाऱ्या वारशाची जाणीव करून देणाऱ्या ठरल्या

error: Content is protected !!