गुटखा विक्री आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परिपत्रकही जाहीर
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे आपल्या कार्यक्षेत्रात बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ आढळल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत देत…

