संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी फलटण नगरपालिका सज्ज- मुख्याधिकारी निखिल मोरे
फलटण :-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २८ जून रोजी फलटण मुक्कामी येत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिका अॅक्शन मोडवर असल्याचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फलटण पालिकेकडून सुरु असलेल्या पूर्वतयारीबाबत माहिती देताना मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे…

