फलटण उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट
फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असल्याने कार्यालयातील खाजगी नेमलेले कर्मचारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांची पैशांसाठी अडवणूक करत आहेत याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कार्यालय यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. फलटण येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खाजगी कर्मचारी व एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. नकाशे,…

