फलटणमध्ये मुख्याधिकारी निखिल जाधव ॲक्शन मोडवर; सुपर मार्केट परिसरातील अतिक्रमणे हटवली
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी: फलटण शहरात अतिक्रमण विरोधी मोहिम सुरू करण्यात आली असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत सुपर मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली आहे. शहरातील प्रमुख व्यापारी व वर्दळीच्या सुपर मार्केट भागात असलेल्या बेकायदेशीर फेरीवाले, अनधिकृत दुकाने, हातगाड्या तसेच पथदिवे, फुटपाथ व रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे…

