
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे दोन रानगव्यांचा मुक्त संचार
फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर परिसरातील दोन रानगवे मुक्त संचार करताना आढळून आले. गावातील काही ग्रामस्थांनी या दोन गव्याची छायाचित्रेही मोबाईलमध्ये काढली असून कधी नव्हे ते रानगवा अचानक दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फलटण तालुक्यात विविध पक्षी व वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. रानडुकरे, बिबट्या, मुंगूस, मोर, वानर, रानमांजर यांसह विविध प्राणी तालुक्यात आढळून येतात….