महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण, दि. ६ : महावितरणकडून २२ केव्ही फलटण फीडरवरील उच्चदाब (HT) वीजवाहिनीची देखभाल व झाडांच्या फांद्यांची छाटणी (ट्री कटिंग) करण्यात येणार असल्याने मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत काही भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
वीजपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये विद्यानगर, संजीवराजे नगर, बिरदेव नगर, हाडको कॉलनी, भडकमकर नगर, पद्मावती नगर, दत्तनगर, बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठ, शनी नगर तसेच संपूर्ण मलठण परिसर यांचा समावेश आहे.
महावितरणने नागरिकांनी आवश्यक कामांचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. देखभाल काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

