गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा अन्यथा महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा : रयत क्रांती संघटना

फलटण प्रतिनिधी: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोठे करायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे या कायद्याच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाभ न धरणाऱ्या गाई म्हशी वयस्कर गाई विविध कारण मुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना…

Read More

आधार कार्ड अपडेट सेवा बंद असल्याने ढेबेवाडी सह परिसरातील नागरिकांचे हाल, सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ढेबेवाडी प्रतिनिधी:- गेल्या अनेक महिन्यापासून ता. पाटण येथील ढेबेवाडी,तळमावले या ठिकाणच्या सेतू कार्यालयामधील आधार कार्ड अपडेट करण्याचे काम बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ढेबेवाडी,तळमावले या ठिकाणच्या सेतू कार्यालयामधील आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. आधार कार्ड अपडेट करिता डोंगरदऱ्यातून 15 ते 20 किलोमीटर चा प्रवास करून कधी…

Read More

ढेबेवाडी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकरी चिंतेत, पशुधनाचे आरोग्य धोक्यात

ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी ता.पाटण येथे गेल्या चार महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ढेबेवाडी येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पशुधनावर अवलंबून आहे. दूध व्यवसाय, शेतीची कामे आणि इतर अनेक गोष्टींसाठी जनावरे शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग आहेत. मात्र,…

Read More

ढेबेवाडीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ,रेशनिंग दुकानात मिळतोय सडलेला गहू, आळ्या झालेला तांदूळ

ढेबेवाडी प्रतिनिधी :- पाटण तालुक्यातील रेशनिंग दुकानांतून नागरिकांना सडलेला गहू आणि आळ्या झालेला तांदूळ वितरिता झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेल्या या थेट खेळामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप उसळला असून हे धान्य तालुका पुरवठा अधिकारी व गोडाऊन कीपर यांनी आधी खाऊन दाखवावे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या नागरिकांना तीन महिन्यांतून…

Read More

ढेबेवाडी येथील गटार तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

ढेबेवाडी प्रतिनिधी :- दोन ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादामुळे गटारगंगा रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याप्रकरणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील ग्रामपंचायतीने ढेबेवाडी ता. पाटण (ढेबआळी ) येथे मोरे दुकान ते काळगुडे गुरुजी यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधले आहे. या गटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काही…

Read More

भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले दोन ट्रॅक्टर व पोकलैंड जप्त, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले तब्बल ६५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन जप्त करून कर्नाटकातील आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींनी अटक करून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील शेतकरी विनय…

Read More

महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा राजाळे येथे शुभारंभ

फलटण प्रतिनिधी: महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” अभियानाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत राजाळे येथे सकाळी १०.३० वाजता होणार असून “सेवा पंधरवडा” अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे. “सेवा पंधरवडा” अभियानात प्रथम टप्प्यात शिवरस्ते, पाणंद रस्ते यांचे सीमांकन घेऊन नकाशावर नोंदी करणे तसेच रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत….

Read More

फलटण तालुक्यात “सेवा पंधरवडा” चे आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे आवाहन

फलटण प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये “सेवा पंधरवडा” आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली त्या अनुषंगाने सचिन पाटील, आमदार, फलटण (अ.जा.) विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय…

Read More

ढेबेवाडी बाजारतळ येथील श्री गणेश मंडळ गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

ढेबेवाडी प्रतिनिधी – ढेबेवाडी ता. पाटण येथे शनिवारी श्री गणेश मंडळ बाजारतळ येथील दगडू शेठ गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात झाले. डॉल्बीला फाटा देत अध्यात्मिक व सात्वीक वातावरणात पारंपारिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात तसेच गेले पंधरा वर्षापासून गुलाल विरहीत काढण्यात आलेल्या ढेबेवाडी येथील श्री गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने पंचक्रोशीच्या गणेश मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. भक्तीमार्गाऐवजी…

Read More

अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड सुरुच ; दिलीपसिंह भोसले

फलटण प्रतिनीधी:- महाराजा मल्टीस्टेट संस्था प्रगतिपथावर असून सभासदांचा विश्वास जपण्यास यशस्वी ठरली आहे ,त्यामुळेच संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचे दिसत असून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेट ची घोडदौड सुरु असून महाराजा मल्टी पर्पज च्या माध्यमातून विविध उपक्रम भविष्यात राबविले जातील, असे प्रतिपादन महाराजा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. महाराजा…

Read More
error: Content is protected !!