सर्प दंशाने १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ढेबेवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ओंकार खंडोबा मदने वय वर्ष १२ राहणार जानुगडेवाडी (मदने वस्ती) यांस दिनांक १८ रोजी रात्री राहत्या घरी अस्वस्थ वाटून अचानक तब्येत बिघडल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता सदर व्यक्तीला सर्पदंश झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर उपचार चालू असताना दिनांक २० रोजी सकाळी १०:१५ वाजता त्याचे निधन झाले. उत्तरीय…

