संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा
फलटण – विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला…

