जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे बुधवार दि. २३ जुलै रोजी फलटण येथे आयोजन
फलटण प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे. गेली ३५ वर्षे फलटण तालुक्यात, किंबहुना सातारा जिल्ह्यात वृत्तपत्र क्षेत्राबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात…

