आरटीई २५% प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षित जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत खाजगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम १२(१)(क) नुसार…

