घरकुल लाभार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला अखेर यश – स्वप्निल गायकवाड

वाई प्रतिनिधी:- मागील अनेक महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळताना दिसत आहे. वाईचे प्रांताधिकारी यांच्या आदेशाने पहिल्या टप्प्यात दिनांक १६/५/२०२५ रोजी सकाळी ११ पासून वाई तहसील कार्यालय या ठिकाणी वाळू साठी पास देण्याचे काम महसूल प्रशासन व ईसेवा केंद्रधरक यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले.

वाईत सुरू असणाऱ्या ४ डेपो पैकी आसले या ठिकाणी असणाऱ्या डेपो मध्ये उपलब्ध असणारा साठा हा घरकुल लाभार्थी यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे. या डेपो मधून वाळूचे वितरण घरकुल लाभार्थ्यांना होणार आहे अशी माहिती महसूल प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये २०० लाभार्थी यांना वाळूचे वाटप करण्यात येणार आहे व टप्प्याटप्प्याने वाळूची उपलब्धता करून उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत वाळू पोहोचवण्यात येईल.

त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी पास देण्यात आले होते मात्र वाळूची उपलब्धता नसल्यामुळे ज्यांचे पास अवैध झाले त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विशेष तोडगा काढून त्यांनाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाळूचे वाटप करण्यात येईल ही माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. ही सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल व वाई तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वाळू पोहोचेल अशी अपेक्षा आम्ही करत आहोत. यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कसलाही खंड पडणार नाही व आम्हाला पुन्हा पुन्हा कोणतेही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हे गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या यशाचे खरे श्रेय पक्षातील सर्व पदाधिकारी व सर्व सामान्य घरकुल लाभार्थी यांना जाते हे सांगणे फार गरजेचे आहे असे गायकवाड यांना सांगितले.सर्व सामन्यासाठी काही तरी करण्याचे भाग्य लाभले याचे समाधान कायम राहील व यातून मिळालेली ऊर्जा ही खूप बळ आणि आत्मविश्वास देणारी आहे.

स्वप्निल गायकवाड यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा प्रत्यय

घरकुल लाभार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात यश येईपर्यंत चिकाटीने लढा दिला व गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य यांच्यासाठी काम करणारे कोणीतरी समाजात आजही जिवंत आहे याची जाणीव करून दिली.

error: Content is protected !!