महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :- ढेबेवाडी ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी मार्गावर बसस्थानक समोरील चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या प्रमुख रस्त्यावरती जीवघेण्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.
दिनांक २४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सूमारास कुनाल पवार व सुरेखा चव्हाण व त्यांच्या सात वर्षाचा मुलगा राहणार सळवे ता. पाटण हे दुचाकी वरून कराड कडुन सळवे गावला जात असताना ढेबेवाडी चौकातील खड्या मध्ये दुचाकी आदळ्याने संतुलन गमावून त्यांचा अपघात झाला. संबंधित महिला व त्यांचा मुलगा दुचाकीवरून खाली पडले व महीला बेशुद्ध झाली.
अपघात झाल्याचे पाहताच आसपासच्या काही समाजीक कार्यकर्त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स बोलावून ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. काही वेळाने महिला शुद्धवर आली. मात्र त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यावरती उपचार सूरु आहेत. ढेबेवाडी परिसरातील खड्डे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत. ढेबेवाडी – कराड हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने ये -जा करत असतात.
अचानक समोर आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी स्वार आपले संतुलन गमावून पडत आहेत तर चार चाकी वाहने खड्ड्यात आधळून पंक्चर होणे किंवा गाडीचे मोठे नुकसान होणे अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अनेकदा वाहने एकमेकांवर आदळून लहान मोठे अपघातही होत आहेत.
संबंधित विभागा खड्डे भरण्याकडे डोळे झाक करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एखाद्या वाहनधारकांचा जीव गेल्यावर संबंधित विभागाचे डोळे उघडणार का अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून केल्या जात आहेत.

