महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून सुरवडी गावचे युवा नेते माजी मंत्री श्री महादेव जानकर यांचे कट्टर समर्थक कु. विशाल बापू माडकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत.

विशाल बापू माडकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद व सुरवडी तेथे 1ली ते 7 वी पर्यंत , माध्यमिक शिक्षण 8वी ते 10 वी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी येथे पूर्ण झाले. 10 वी नंतर त्यांनी गौरीशंकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट सातारा येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन शाखेत पदविका शिक्षण घेतले. त्यानंतर टाटा कमिन्स सुरवडी येथे कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलीटी पदावर दीड वर्ष काम करून पदोन्नतीने कमिन्स पॉवर जनरेशन युनिट येथे इंजिनिअर पदावर काम केले.
कमिन्स मध्ये काम करत असताना स्थानिक भूमिपुत्र आणि कामगार यांच्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करून सुद्धा विशाल बापू माडकर यांनी स्थानिक भूमिपुत्र आणि कामगार यांच्यासाठी लढा सुरू ठेवला . राजकीय हस्तक्षेप होऊन कमिन्स कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावरून कमी केले. या निर्णयाला त्यांनी कामगार न्यायालयात आव्हान दिल्यावर कंपनी प्रशासनाने सशस्त्र दरोड्याची केस टाकून त्यांना दोन दिवस जेल मध्ये पाठवले.
एवढ सगळ करून नमतिल ते माडकर कसले म्हणून गाव पुढाऱ्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्यांचा सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे जिल्ह्यातून दोन वर्षा साठीचा तडीपार प्रस्ताव मंजूर करून घेतला. पण नियतीने यावेळी विशाल बापू माडकर यांना साथ दिली वरिष्ठ पातळीवर सूत्र हलवून मंत्री श्री महादेव जानकर यांच्या मदतीने विशाल बापू माडकर यांनी या अडचणीतून आपली सही सलामत सुटका करून घेतली.
सुरवडी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून थेट सरपंच पदासाठी त्यांच्या आईला उभे करून स्वतः आणि भाऊ त्यांनी सदस्य पदासाठी उभे राहिले होते. मतदार राजाने त्यांना भरभरून दान न दिल्याने या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांचा गावच्या राजकारणात वाढता राजकीय हस्तक्षेप सहन न झाल्याने गाव पुढाऱ्यांनी पुन्हा एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तडीपार केले होते. त्यावर पोलिसांनी विशाल बापू माडकर यांना वैयक्तिक भेटून घडलेल्या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.
आता विशाल बापू माडकर वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्यास सज्ज झाले आहेत. सुरवडी गावातील नागरिकांच्या समस्यावर सातत्याने आवाज उठवून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना धारेवर धरून लोकांची अडचण सोडविण्यावर त्यांचा भर असतो. नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरुद्ध लढ्यात सोशल मीडियावर आवाज उठविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

