सुलेखा शिंदे यांची कादंबरी ‘महात्मा फुले’ पुरस्काराने सन्मानित

सासवड : ‘महात्मा फुले’ यांच्या समाजपरिवर्तनाचं महत्व सांगून संम्मेलनाचे उद्घाटक, दै. पुढारीचे संपादक मा. सुनिल माळी यांनी ‘फुले’ यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा आढावा घेतला. फुले यांनी आपल्या साहित्यातून, अनिष्ट रुढी-परंपरेवर कोरडे ओढले. त्यांच्या कथनानं साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्याच शुभहस्ते इतर मान्यवरांच्याप्रमाणेच फलटणच्या कादंबरीकार सुलेखा शिंदे यांच्या ‘साळवणाची खोप’ या कादंबरीला ‘महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी संम्मेलनाध्यक्ष प्रशांत देशमुख, स्वागताध्यक्ष गौरव कोलते, कलावंत सूरज चव्हाण अशा मान्यवरांनी आपली मनोगते प्रगट केली. या संम्मेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मंडळी उपस्थित होती.या संम्मेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवरांना धन्यवाद दिले आणि महात्मा फुले यांच्या ‘खानवडी’ या जन्मगावाला वर्षातून एकदा तरी येवून अभिवादन करावे ही कळकळीची विनंती त्यांनी केली.

याप्रसंगी ‘सर्ज्या’ कार सुरेश शिंदे, समाजचिंतक महादेव गुंजवटे, कादंबरीकार संपत टेंबरे, शिवाजी जाधव, वसंतराव पाटील, तानाजी जगताप यांनी निरा खोऱ्यातील साहित्यिकांच्या वतीने गेली १८ वर्षे खानवडी गावात साहित्य संम्मेलन भरवत आल्याबद्दल दशरथ यादव यांचा शाल, श्रीफळ व साहित्याचा संच देवून सत्कार केला.सुरुवातीला खावनवडी गावचे ग्रामस्थ मा. रविंद्र फुले, कांता फुले, मोहनराव फुले यांनी सर्व मान्यवर मंडळींचे स्वागत केले तर शेवटी मराठा महासंघाचे उपाध्यक्ष मा. राजाभाऊ जगताप यांनी आभार मानले.

error: Content is protected !!