एकनाथ शिंदेंची वाट बिकट ? ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ पक्ष ठाकरेंना मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदे केंद्रात जाणार?

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले

शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील काही दिवसात न्यायालयीन निकाल होऊन ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ पक्ष ठाकरेंना मिळण्याची किंवा ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांना आणि ‘शिवसेना’ पक्ष उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता असल्याची माहिती राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिले होते.निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहाता शिंदे हे ठाकरेंपेक्षा सरस ठरला होता. या आधारावर धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळू शकते अशीही शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आमदार फुटीच्या आधारे ‘शिवसेना’ पक्ष हा देखील एकनाथ शिंदे यांना दिला होता.

राज्यघटनेच्या परिशिष्ट दहानुसार आमदार अपात्रतेचा विषय न्यायालयात निकाली निघाला नाही. याच कारणास्तव निवडणूक आयोगाचा हा आदेश रद्द करत ‘शिवसेना’ पक्ष हा उद्धव ठाकरेंना दिला जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे निकालाचे भवितव्य काय असेल याचा कायदेतज्ज्ञांनी बांधलेला हा निव्वळ अंदाज आहे.

निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ पक्ष म्हणून मान्यता दिली होती, ज्यामुळे त्यांना ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव वापरण्याची परवानगी मिळाली. उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्रातील आगामी पोटनिवडणुकांसाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने 1971 च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्याचा दाखला देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

महायुती सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सध्या स्थितीत राज्यात भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र असून पुढील काही दिवसात शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजपामध्ये समाविष्ट होऊन एकनाथ शिंदे यांना केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री पद घ्यावे अशी ऑफर भाजपने दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या आमदारांना घेऊन भाजप पक्ष समाविष्ट न केल्यास शिवसेना एकनाथ शिंदे गटातील काही आमदार व खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांनी योग्य निर्णय न घेतल्यास पक्ष फुटीचा फटका एकनाथ शिंदेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या काळात राज्यसह देशात चांगलीच राजकीय घडामोडी पहावयास मिळणार असणार आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे न्यायालयातील निकालाच्या अनुषंगाने पक्षाच्या बाबतीत कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण म्हणाले होते की, मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत ऑल इज नॉट वेल आहे का? असाही प्रश्न समोर आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप पक्षात फोडाफोडी सुरुच आहे. या फोडाफोडीचा वाद कोणत्याही क्षणी टोकाला जाऊ शकतो. पुढील काही दिवसात राज्यात सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी करणार असून या घडामोडीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

error: Content is protected !!