महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
कराड मलकापूर प्रतिनिधी – येथील प्रभाग क्रमांक एक मधून नुकतेच निवडून आलेले नगरसेवक शिवसेना ठाकरे गट चिन्ह मशाल नितीन काशीद हे 319 मतांनी विजयी झाले यानिमित्ताने नितीन काशीद यांचा सत्कार करण्यात आला.
नितीन काशीद यांनी पुन्हा मशाल पेटवून दाखवली आहे. त्यांची समाजकार्य आणि राजकीय कार्यअतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि असेच समाजकार्य त्यांनी करत राहावे आणि प्रभागात सतत नागरिकांच्या संपर्कात राहून कामाचा आढावा घ्यावा व ते काम पूर्ण करण्यास जास्तीत जास्त महत्त्व द्यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
त्यांच्या सत्कार प्रसंगी ज्ञानदेव भोसले महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा सचिव सातारा माणिक सूर्य गंध, महाराष्ट्र वाहतूक सेना मलकापूर शहर प्रमुख अमित चव्हाण, शाखाप्रमुख शेरे सतीश कुंभार, शाखाप्रमुख तळबीड जालिंदर पाटील, सुरज माने,शिवसैनिक नितीन खेडकर, तालुका संघटक दत्तात्रय गायकवाड, शाखाप्रमुख शेरे स्टेशन सचिन चव्हाण, शिवसैनिक यांच्या हस्ते नितीन काशीद यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

