पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे फलटण नगरपरिषदेचे आवाहन, मंगळवारपासून अतिक्रमण हटवण्यास सुरवात होणार

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून नागरिकांना अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपरिषदेकडून जारी करण्यात आलेल्या सार्वजनिक आवाहनानुसार, रस्त्यांच्या बाजूस असलेली कच्ची-पक्की बांधकामे, अनधिकृत वाढीव बांधकामे तसेच व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा नगरपरिषदेकडून थेट कारवाई करण्यात येणार असून, त्यातून होणाऱ्या नुकसानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईमध्ये दुकानधारक, व्यावसायिक, टपरीधारक, हातगाडी चालक आदींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटविण्याची कारवाई खालील मार्गांवर करण्यात येणार आहे :

गिरवी नाका ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा

श्रीमंत मालोजी राजे पुतळा ते गजानन चौक

गजानन चौक ते पांचबत्ती चौक

पांचबत्ती चौक ते उबेश्वर चौक

उबेश्वर चौक ते जिंती नाका

डेक्कन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक

नाना पाटील चौक ते श्रीराम कारखाना

फलटण नगरपरिषद यांना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अतिक्रमणे स्वखर्चाने हटवावीत, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!