वाई-सुरूर मार्गावर वृक्षतोड झाल्यास आत्मदहन : स्वप्नील गायकवाड
वाई :- वाई-सुरूर रोडवर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या रस्त्यावर पर्यटकांना तसेच प्रवास करणाऱ्यांना सुखद सावली देणारी अनेक शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जाणार असल्याने येथील पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ‘आरपीआय’च्यावतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सातारा यांना निवेदन देऊन वृक्षतोड झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा ‘रिपाइं ‘ने दिला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले…

