आमदार योगेश टिळेकर यांचे मामा यांची अपहरण करून हत्या

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क पुणे :- भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवत गावाच्या परिसरात त्यांचा मृतदेह सापडला आहे. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी…

Read More

वाठार कॉलनी फाटा ते वीर धरण रस्त्यावरील धोकेदायक साईडपट्ट्यामुळे अपघातामध्ये वाढ

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा :- खंडाळा – वाठार कॉलनी फाटा ते वीर रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने व सतत ट्रॅफिक असल्यामुळे व ह्या रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे मालवाहतूक गाडी चालक रस्ता सोडून खाली गाडी घेत नसल्यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार सतत घडत आहेत . तसेच अपघात देखील होत आहेत. गेल्या २-३ वर्षापासून सातत्याने ही…

Read More

महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ येथे गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा :- महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५/१२/२०२४ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास केसूर्डी गावच्या हद्दीत असलेली एल्जिन ग्लोबल इंडिया केसूर्डी या कंपनीमध्ये पुरुष टॉयलेट मधील…

Read More

संविधान निर्मितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसाशी जोडले – अनिरुद्ध गाढवे

खंडाळा :- ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खंडाळा शहर भाजप यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (संजीव) शंकरराव गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिरुद्ध गाढवे म्हणाले-“भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुष व वीरांगणा यांनी हौतात्म्य स्वीकारले स्वतंत्र भारताला…

Read More

नामांकित सि. ए. विजय बाबुराव अनपट यांची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयरन मॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी.

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:- युवा उद्योजक आणि नामांकित सि.ए विजय बाबुराव अनपट यांनी जागतिक पातळीवर आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातील बसल्टन शहरात १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित फुल आयरन मॅन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विजय अनपट यांनी ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२…

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडगणी येथे दिली सदिच्छा भेट

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई :- सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच वाई पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी विजय परीट यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडगणी तालुका वाई येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी वासोळे गावाचे सरपंच ज्ञानदेव कोंढाळकर तसेच माडगणीतील ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये सर्व मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक विद्यार्थी यांनी…

Read More

फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे अधिकारी व कर्मचारी विनापरवानगी मुख्यालय सोडून गायब

फलटण:- महावितरण प्रशासनाने वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यात याव्यात या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये अशा सूचना वारंवार दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अनेकदा या सूचनांचे उल्लंघन फलटण महावितरण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मुख्यालयात वास्तव्यास नसलेल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठवण्याचे आदेश असताना कारवाई कुणी करायची आणि कुणावर करायची…

Read More

उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल, मारकडवाडी गावात बॅलेट मतदान प्रकरणी गुन्हे दाखल

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपर मतदान प्रकरणी अजूनही गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरूच आहे. शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माळशिरच्या मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार जानकरांसह शेकडो…

Read More

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! उद्या संध्याकाळी महायुतीचा शपथविधी

मुंबई:- भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित केलंय. त्यांच्या नावाला आज सकाळी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महायुती सत्ता स्थापनेचा दावा आज करणार आहेत. फडणवीस उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यापूर्वी…

Read More

महाराष्ट्रात जाणवले भूकंपाचे धक्के – गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

गडचिरोली – तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपची तीव्रता ५.३ रिक्टर स्केल अशी नोंदविण्यात आलेली आहे. मुलुगु भूकंपाचे केंद्रबिंदू असले तरी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. त्यामुळे याठिकाणी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा…

Read More
error: Content is protected !!