महाराष्ट्र
सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला, घरात घुसून चाकूने केले सहा वार
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास चोरट्याने चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. सैफवर 6 वार करण्यात आले आहेत. हात, मान आणि पाठीच्या मणक्यात वार झाले आहेत. माहितीनुसार सैफवर वार करणाऱ्या चोराचं सैफच्या मोलकरणीसोबत भांडण झालं. सैफ तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला….
रणजीत भोईटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
फलटण:- विद्यानगर भागातील युवा नेते रणजीत भोईटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विद्यानगर येथील सामाजिक कामात अग्रेसर असणारे रणजीत संभाजीराव भोईटे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
फलटण:- जिल्हा परिषद सातारा आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तकप्रेम तसेच ‘मला भावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ या दोन्ही विषयांवर लहान गटातून इयत्ता चौथीतील वैष्णव विकास खराडे याने प्रथम क्रमांक तर…
एकाच वाहनाचे दोनदा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची आर्थिक फसवणूक
फलटण : चिटबॉय, ऊस तोडणी कंत्राटदार, ट्रॅक्टर चालक यांक श्री दत्त इंडिया कारखान्याचा शेतकरीकोड असणाऱ्या शेतकऱ्यास हाताशी धरून एकाच वाहनाचे दोनदा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहित एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दहा जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात…
पुणे बेंगलोर हायवेवर खड्डा चुकवताना अपघात होऊन युवती जागीच ठार तर युवक गंभीर जखमी
शिरवळ – पुणे बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी (ता.खंडाळा) परिसरात खड्डा चुकविण्यासाठी वेग कमी केल्याने दुचाकीला ट्रकची मागून धडक बसून झालेल्या अपघातात युवती जागीच ठार झाली, तर युवक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवारी (दि.12) रोजी महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना दुचाकीचा क्रमांक (MH.01.DJ.8365) वेग अचानक कमी केला यावेळी…
कंपनीच्या कामाचा ठेका घेण्यावरून केसूर्डीत राडा
खंडाळा – केसूर्डी येथे कंपनीच्या कामाचा ठेका घेण्यावरून झालेल्या वादातून लोखंडी हत्याराने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील माजी सरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांसह तब्बल २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून केसुर्डी येथे एका कंपनीचे कामे चालू आहे. दरम्यान, केसुर्डी येथील कंत्राटदार प्रशांत रमेश ढमाळ…
३६ वर्षांनी माजी शिक्षक व विद्यार्थी यांची भरली शाळा
खंडाळा:- गेट-टुगेदर, स्नेह मेळावा रामेश्वर विद्यालय विंग ता.खंडाळा जिल्हा सातारा. एस.एस.सी. सन १९८८-८९ बॅच चा दि. १२/०१/२०२५ रोजी रामेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उल्हासात, संपन्न झाला. ३६ वर्षानंतर दहावीचे ते विद्यार्थी आज पन्नाशी पार करून एकत्र आले. त्यासाठी भव्य मंडप, आकर्षक रांगोळी, सुंदर मंच व्यवस्था, प्रसन्न, वातावरण व नेटके नियोजन यामुळे हा कार्यक्रम अतिशय रंगत गेला….
पसरणीतील पिडीत कुटुंबाला डॉ.अजय पाटील यांची मदत,वाईतील डॉ.अजय पाटील जपली सामाजिक बांधिलकी
वाई :- पसरणी येथील जळीतग्रस्त केळगणे कुटुंबीय यांच्या मदतीला गावा बरोबर तालुक्यातील विविध स्तरातून मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. घराला लागलेल्या आगीत आपलं सर्वस्व केळगणे कुटुंबाने गमावले. अतिशय सामान्य जीवन जगणारे हे कुटुंब गावाच्या वरच्या बाजूला रानात एकटेच राहते. आकस्मित लागलेल्या आगीमुळे घरातील धान्य ऐवज कागदपत्र व सर्व वस्तू जळून खाक झाल्या राहिली ती फक्त…
मांडकीमध्ये बिबट्याचा वासरावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पुरंदर :- मांडकी (ता. पुरंदर) परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (शनिवार दि.११) रोजी मांडकी येथील धुळोबा वस्ती येथील नारायण जगताप यांच्या घराजवळील गोठ्यातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून, वासरांस जखमी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जगताप यांच्या गोठ्यात चार जनावरे बांधली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी पाचच्या दरम्यान बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर…

