कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

फलटण : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टिकरण…

Read More

फलटण नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण — आगामी फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादांच्या नेतृत्वाला नागरिक, तरुणवर्ग आणि उद्योजक व व्यापारी बांधव यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी…

Read More

वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून विशाल बापू माडकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून दावेदारी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून सुरवडी गावचे युवा नेते माजी मंत्री श्री महादेव जानकर यांचे कट्टर समर्थक कु. विशाल बापू माडकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत. विशाल बापू माडकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद व सुरवडी तेथे 1ली ते 7 वी पर्यंत , माध्यमिक शिक्षण…

Read More

श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगर परिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू

फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण नगर परिषदेची निवडणूक सन – २०२५ नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राजे गटाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरच्या मुलाखतीत “गोविंद…

Read More

आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर बदल घडवायचा आहे. : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण :- मला माझ्या फलटणमधील जनतेने मोठे केले आहे. रणजितसिंह निंबाळकर कधीही मस्तीत वागला नाही. अधिकाऱ्यांना कधीही ब्र शब्द काढलेला नाही.आमच्याकडील काही लोक स्वतःला शहेनशाह समजतात. आमच्याकडची त्यांची जहॉगिरी गेली; पण त्यांची फुगिरी अजून गेलेली नाही. पुढून येणारे साप आहे की कुत्रं आहे, तो चावायला आला आहे की चाटायला हे आता आमच्या लक्षात येतंय. पण…

Read More

फलटणच्या विकासासाठी रणजितसिंह यांनी सातत्याने संघर्ष केला :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण : फलटणच्या विकासासाठी ज्यांनी सातत्याने संघर्ष केला त्या रणजितसिंह ना निंबाळकर यांच्या साठी व फलटण, माण ,खटाव मधील नागरिकांसाठी मला आनंद होतोय फलटण सारख्या ऐतिहासिक भूमीत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांच्याकडून मोठया प्रमाणात विकास होतोय याचाही आनंद आहे नीरा देवधरचा पहिला टप्पा पूर्ण होत असतानाच आज दुसऱ्या टप्प्याचे भूमीपूजन होत आहे पूर्वी या…

Read More

कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय मिळणार आहे ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण :- मी या ठिकाणी येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न झाला आमची लहान बहीण जी डॉक्टर होती तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे कोणत्याही परिस्थितीत त्या बहिणीला न्याय मिळणार आहे आरोपींना शिक्षा मिळणार आहे परंतू प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतोय महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे थोडीशी जरी शंका माझ्या मनात…

Read More

फलटण नगर परिषद प्रभाग निहाय आरक्षण जाहीर, नव्या राजकीय समीकरणाची सुरवात

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने फलटण शहर हे १३ प्रभागात विभागले असून फलटण नगरपरिषदेमध्ये २७ नगरसेवक असणार आहेत त्यामध्ये ५ नगरसेवक हे अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत तर एकूण १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. नगरपरिषदेची लोकसंख्या ५२,११८ इतकी आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित…

Read More

फलटण नगरपरिषद अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार

विक्रम विठ्ठल चोरमले फलटण : आज सकाळी ११ वाजता मंत्रालय मुंबई येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण खुला’ प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे फलटण नगर परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण खुले झाल्याने येणाऱ्या नगरपरिषदेची निवडणूक ही फार रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण…

Read More

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; प्राभगनिहाय मतदार यादी ‘या’ दिवशी प्रसिद्ध होणार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवार आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख जाहीर…

Read More
error: Content is protected !!