फलटण तहसील पुरवठा विभाग बनला ‘बैठकीचा अड्डा’? नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार
फलटण (प्रतिनिधी) : फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा सध्या नागरिकांच्या कामांसाठी कमी आणि खाजगी अनधिकृत कर्मचाऱ्यांच्या बैठका, गप्पा-टप्पांसाठी जास्त वापरला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. रेशनकार्ड, नाव दुरुस्ती, नवीन नोंदणी, धान्य वितरणाबाबतच्या तक्रारी यांसाठी नागरिक दिवसभर हेलपाटे मारत असताना कार्यालयात मात्र “बैठकींचा अड्डा” सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक सांगतात…

