जि.प शाळा मिरगावचे एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरगाव या शाळेतील तब्बल दहा विद्यार्थी एनएमएमएस या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल मिरगाव ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी अभिनंदन व कौतुक व्यक्त केले आहे.

यामध्ये मनमित कमलाकर मोहिते व पायल लक्ष्मण पवार हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून प्रत्येकी सुमारे ४८००० रुपये रक्कम या विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेत इतरही आठ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.त्यामध्ये राजकन्या खताळ,पुर्वा फरांदे,धैर्यशील सरक,साक्षी सरक, स्वरा सरक,श्रुतिका खताळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

त्यांना आदर्श शिक्षक दिगंबर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सायलीताई तुकाराम सरक, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले,उपसभापती अमोल सस्ते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप सरक, उपाध्यक्ष दादासो खताळ, फलटण पंचायत समितीचे गटविकास गटविकास अधिकारी बोंबले, गटशिक्षणाधिकारी मठपती,केंद्रप्रमुख संजय धुमाळ, विस्ताराधिकारी अलका माने, मुख्याध्यापक संजय कचरे यासह सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!