निरगुडीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम; १३५ संविधान उद्देशिका, १३५ वृक्ष वाटप व रक्तदान शिबिर

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी : दि. २७ रोजी विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त निरगुडी येथे सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

रक्तदान, संविधान जागर आणि वृक्षसंवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रमाला नागरिक तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला लोकध्यास वृत्तपत्राचे संपादक राजकुमार काकडे, महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अप्पा गायकवाड, बहुजन समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रेम मोरे, तसेच सचिन माने, आशिष काटे, ॲड. ऋषिकेश बिचुकले, मा. सरपंच जालिंदर सस्ते, महेंद्र गोरे, धनंजय लकडे, हणमंत गायकवाड, महादेव गोरे, संदीप खवळे आणि पै. पवन लकडे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या १३५ प्रतींचे वितरण करण्यात आले तसेच १३५ वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संविधान मूल्यांचा प्रसार आणि पर्यावरण जपणूक या दुहेरी उद्दिष्टांचा प्रभावी संगम या उपक्रमातून दिसून आला.सिद्धार्थ तरुण मंडळ, निरगुडी, एस.टी.एम बॉयज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती, निरगुडी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदात्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!