फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई; २ गावठी पिस्टल, जिवंत काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

७ मे २०२६

फलटण : फलटण ग्रामीण पोलीसांनी धाडसी कारवाई करत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर मोटारसायकल आणि तीन मोबाईलसह तब्बल ₹२,५०,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

दिनांक ५ जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतीक प्रमोद खुंटे हा आपल्या साथीदारासह गावठी पिस्टल बाळगून मौजे दुधेबावी (ता. फलटण) परिसरात येणार आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.पोलीसांनी दुधेबावी गावाच्या हद्दीत सापळा रचला असता संशयित दोघे पल्सर मोटारसायकलवरून जाताना दिसले.

पोलीसांची चाहूल लागताच त्यांनी फलटण–दहिवडी मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी फिल्मी शैलीतील पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:1. प्रतीक प्रमोद खुंटे (वय २५), रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे (मूळ रा. भादे, ता. खंडाळा, जि. सातारा)2. प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे (वय २१), रा. काळुबाईनगर, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा

झडतीदरम्यान प्रतीक खुंटे याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. पुढील चौकशीत त्याने आणखी एक गावठी पिस्टल करण कानिफ घोलप याला समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे यांच्या मदतीने विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी पुढील कारवाई करून संबंधित पिस्टल जप्त केले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले इतर आरोपी:करण कानिफ घोलप, रा. मंगळवार पेठ, फलटणसमीर उर्फ वर्धन बाळासो खवळे (वय २२), रा. मांडवखडक, ता. फलटण, जि. सातारा

पोलीसांनी आरोपींकडून २ गावठी पिस्टल, १ जिवंत काडतूस, १ पल्सर मोटारसायकल आणि ३ मोबाईल फोन असा एकूण ₹२,५०,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तपासात असेही निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी प्रतीक खुंटे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात मारहाण, धमकी व महिलेशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

तसेच आरोपी करण घोलप याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, बेकायदेशीर जमाव व इतर विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार तसेच नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणुमंत दडस, सुरज काकडे, गणेश यादव, विक्रम बनकर, तुषार नलवडे आणि अमोल देशमुख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

error: Content is protected !!