प्रेमाच्या जाळ्यात ओढून हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल; खोट्या बलात्कार प्रकरणाची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या फलटण येथील टोळीला अटक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : प्रेमाच्या जाळ्यात ओढून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत हॉटेल व्यावसायिकाकडून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या सराईत टोळीला फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करून मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अनोळखी आरोपी आणि एका महिलेचा शोध सुरू आहे. दि. ११ फेब्रुवारी २०२६…

Read More

चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल होणार, उत्तर प्रदेश सरकारचा कडक निर्णय; विक्रेते आणि वापरकर्त्यांना बसणार चाप

राज्यभर छापे टाकण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क लखनौ : चायनीज मांजामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आता चायनीज मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास तो थेट हत्येचा गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट आदेश…

Read More

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत, 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांत अटकेवर निर्बंध

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; नागरिक स्वातंत्र्याला मोठा दिलासा महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क नवी दिल्ली : पोलीस कारवाईतील थेट अटक आणि मनमानी अधिकारांवर कडक मर्यादा घालणारा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल शिक्षा 7 वर्षांपर्यंत आहे, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अशा प्रकरणांत…

Read More

अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून,फलटण ग्रामीण पोलीसांकडून अवघ्या ४ तासांत गुन्हा उघड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणातून तिघांनी मिळून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीसांकडून अवघ्या ४ तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमंथळी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (वय…

Read More

अनुदानित खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघड फसवणूक, टाकळवाडे प्रकरणातून उघडी पडलेली कृषी व्यवस्थेतील गंभीर साखळी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण – शेतकऱ्याच्या मातीशी, पिकाशी आणि भविष्यासोबत थेट खेळ करणारा प्रकार टाकळवाडे (ता. फलटण) येथे उघडकीस आला असून, हा प्रकार केवळ एका सेवा केंद्रापुरता मर्यादित आहे, असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेणे ठरेल. केंद्र शासनाच्या अनुदानित रासायनिक खतांच्या नावाखाली बोगस व अप्रमाणित खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा हा…

Read More

वडूज येथे बनावट खते व कीटकनाशकांचा कारखाना उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वडूज | प्रतिनिधी :सातारा जिल्ह्यातील वडूज (ता. खटाव) येथे सातारा जिल्हा कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा कारखाना उघडकीस आला. शनिवारी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांहून अधिक किमतीचा बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी…

Read More

सस्तेवाडी खून प्रकरण : प्रशासनाची कसोटी, रामोशी समाजाची न्यायाची मागणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण – फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेली गणेश बाळू मदने यांची निर्घृण हत्या ही केवळ एका गरीब व्यक्तीची हत्या नसून, ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला थेट घाला आहे. शेतात मेहनत करणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तीवर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करून त्याचा बळी घेतला, ही घटना…

Read More

टाकळवाडे सोसायटीत बनावट खतविक्री, फलटण ग्रामीण ठाण्यात दोघांवर गुन्हा; कृषी विभागाकडून कारवाई

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण (प्रतिनिधी) : टाकळवाडे (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना बनावट खतांची विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळवाडे तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा…

Read More

सस्तेवाडी येथे एकाच खून, खून प्रकरणी दोघांना अटक

फलटण- भांडणातून झालेल्या खून प्रकरणाचा अपघात भासवण्याचा प्रयत्न करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणा-या दोन आरोपींना फलटण ग्रामीण पोलीसांनी खून प्रकरणात अटक केली असून याप्रकरणी दोन जणांचे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार , सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा गावाच्या हद्दीत लोंढे वस्तीजवळ फलटण रोडवर गणेश…

Read More

वाठार निंबाळकर सार्वजनिक रस्ता उकरून दहा लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल

फलटण – फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावाच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ता उकरून अज्ञात व्यक्तीने शासनाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. ३ रोजी दुपारी २.५६ वाजेपर्यंत घडल्याचे तक्रारीत…

Read More
error: Content is protected !!