जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भादे मध्ये ‘बाल बाजार’ उत्साहात संपन्न
शिरवळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भादे तर्फे शाळेतील लहान मुलांचा बाल बाजाराचे श्री भैरवनाथ मंदिर भादे येथे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शाळा कमिटीने या लहान मुलांचे बुद्धीकौशल्य आणि व्यवहारज्ञान प्रबळ करण्यासाठी एक आगळावेगळा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी या लहान मुलांनी मोठ्या उत्साहात या बाल बाजाराला उपस्थिती लावून भाजीपाला खाद्यपदार्थ…

