महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
फलटण नगरपरिषदेच्या वसुली विभागातील मालमत्ता कराच्या कथित मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्यानंतर आता दररोज नवनवीन धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. फसवणूक झाल्याचा दावा करणारे नागरिक पुराव्यानिशी स्वतःहून पुढे येत असून, तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या वाढत्या तक्रारी आणि गंभीर स्वरूपाच्या प्रकारांची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत संपूर्ण वसुली विभाग सील केला आहे.
या संदर्भात सहाय्यक विभागप्रमुख माळी यांनी वसुली विभाग सील करण्यात आल्याची माहिती दिली.दरम्यान, या प्रकरणातील गैरव्यवहाराची व्याप्ती नेमकी किती आहे, किती नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे आणि यामध्ये नेमके कोण जबाबदार आहेत, याबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या गैरव्यवहारात सहभाग असणाऱ्या कर्मचाऱ्यांना २४ तासात खुलासा करण्याची कारणे दाखवा नोटीस दिली गेली असल्याची माहिती सहाय्यक विभागप्रमुख माळी यांनी दिली.

