महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी | दि. ५ मे २०२६
फलटण शहरातील काही भागांमध्ये आज (मंगळवार) नियोजित देखभाल कामांमुळे सुमारे सहा तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडून देण्यात आली आहे.
महावितरणच्या वतीने सांगण्यात आले की, HT लाईन व डीटीसी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर) देखभाल कामासाठी २२ केव्ही म्युनिसिपल वाहिनीवरील वीजपुरवठा सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, MSEB कार्यालय परिसर, जलमंदिर, लक्ष्मी नगर, रामराजे शॉपिंग सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डेक्कन चौक, पवार गल्ली, नारळी बाग, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कॉलनी, शंकर मार्केट, दगडी पूल, टेलिफोन एक्सचेंज तसेच एमआरबीसी कॉलनी या भागांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान, हे मेंटेनन्सचे काम नियोजित वेळेआधी पूर्ण झाल्यास संबंधित भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.वीजपुरवठा बंद राहण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती व व्यावसायिक कामांचे नियोजन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

