फलटण प्रतिनिधी| महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | दि. ५ मे २०२६
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इ. १ ली ते इ.९ वी च्या वर्गात विशेष प्राविण्य मिळवून सुयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी, नांदल ता. फलटण येथे ‘गुणगौरव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘यशाचा सोहळा… गुणवंतांचा गौरव!’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाचा गौरव करण्यात आला.
हा सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय , यथार्थ सायन्स ॲकॅडमी (संस्थापक विशाल रसाळ) आणि मातोश्री इलेक्ट्रीकल्स,नांदल (उद्योजक श्री.संभाजी भिलारे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिवाजी जायपत्रे लाभले होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील उत्तुंग यश संपादन करू शकतात. शिक्षणासोबतच शिस्त आणि संस्कारांची जोड असेल तर यश नक्कीच मिळते.
“गुणवंतांचा सत्कार: या सोहळ्यात विविध स्तरांवरील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला:
जि. प. प्राथमिक शाळा (नांदल): इयत्ता १ ली ते ७ वी मधील प्रथम तीन क्रमांक पटकावणारे विद्यार्थी.श्री संत
ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (नांदल): इ. ५ वी ते इ.९ वी मधील प्रथम तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी.
NMMS परीक्षा २०२६: या परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या इयत्ता ८ वीच्या सहा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
विशेष सत्कार: JEE EXAM २०२६ मध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल कु. राजश्री आबा कोकरे (यथार्थ सायन्स अकॅडमी, फलटण) हिचा विशेष सन्मान करण्यात आला.ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद:भैरवनाथ मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला
नितीन कोळेकर(उद्योग उपसंचालक) , तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी कोळेकर (काका), पोलिस पाटील गोविंद कोळेकर, शालेय शिक्षणसमितीचे अध्यक्ष सुनील कोळेकर, देविदास कोळेकर, मुख्याध्यापक काळे सर, धायगुडे सर, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कोळेकर (तात्या),बबन भगत,अंगण कोळेकर,अमोल भगत,किरण कोळेकर तसेच नांदल ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
समस्त नांदल ग्रामस्थ आणि आयोजन समितीने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.”गुणांचा सन्मान हीच प्रगतीची गुरुकिल्ली!” हा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

