फलटणच्या रस्त्यांनी सोडला मोकळा श्वास : रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
फलटण :- गेल्या अनेक वर्षापासून फलटण शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण बोकाळले होते. मात्र आज फलटण नगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्याने फलटणचा रस्त्यांनी मोकळा श्वास सोडला आहे. वाहतुकीस अडथळे ठरणारे हे अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तासह काढण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे निघत असल्याने फलटणकराने पालिकेला धन्यवाद दिले आहेत. अनेक व्यापारांनी चक्क रस्त्याच्या…

