अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व गर्भपात प्रकरणातील आरोपीचा मृत्यू! बारामती व फलटण तालुक्यात खळबळ

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

बारामती/फलटण प्रतिनिधी: बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व बळजबरीने फलटण येथे केलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपीचा आज पोलीस कोठडीत असतानाच मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सदर आरोपीने गळफास घेतल्याची माहिती मिळत असून पोलीसांकडून मात्र या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षाची मुलगी आणि आरोपी ४८ वर्षाचा हे दोन्हीही जवळचे नातेवाईक आहेत. या घटनेतील आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर मुलगी गर्भवती झाल्याने फलटण येथील खाजगी दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात केला होता. मात्र हे प्रकरण पोलीसांसमोर आले आणि पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

यानंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती.आरोपी पोलीस कोठडीत असताना मध्यरात्री त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

error: Content is protected !!