महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात ‘हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून, हिंदुत्वाचा विचार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
हे संमेलन बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमात धर्मरक्षण, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि समाजातील एकजूट या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून निलेश धारायकर उपस्थित राहणार असून ते हिंदुत्व आणि सामाजिक संघटन यावर मार्गदर्शन करणार आहेत.तसेच धर्माचार्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज आणि मातृशक्ती माधुरी नितीन पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या संमेलनासाठी सकल हिंदू समाज, फलटण यांच्या वतीने सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “चला, एकत्र येऊया आणि संस्कृतीचा अभिमान वाढवूया!” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट करावी, असे आवाहन सकल हिंदू समाज समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

