डॉ.महेश बर्वे यांना लिखाणाची वेगळी देणगी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण : ‘‘डॉ.महेश बर्वे यांनी वृक्षारोपण मोहिम हातात घेवून पर्यावरणाचा र्हास रोखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर घेतली; त्याच पद्धतीने लिखाणाचाही ध्यास त्यांनी घेतलेला आहे. फलटणमधील बर्वे कुटूंबामध्ये सर्वाधिक डॉक्टर आहेत. त्यांच्यामधून लेखक म्हणून पुढे येणारे एकमेव डॉ.महेश बर्वे हेच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा देताना वेगळे विचार डोक्यात येणं आणि ते कागदावर लिहून पुस्तकरुपात प्रकाशित करणं…

