सस्तेवाडीत महावितरणच्या शाखा अभियंत्यांच्या दुर्लक्षाचा आरोप; शाखा अभियंत्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : सस्तेवाडी गावातील महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, गावातील अनेक ठिकाणी वाकलेले वीज पोल, लोंबणाऱ्या वीजवाहिन्या, उघडे ट्रान्सफॉर्मर बॉक्स आणि निकृष्ट देखभाल यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनली असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरण प्रशासनाने…

